नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. भूतिया यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आहे, असे जाहीर केले आहे. मी सिक्कीम आणि देशाच्या भल्याकरिता काम करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला होता. परंतु, निवडणुकांचे राजकारण माझ्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, बायचुंग भूतिया यांना गेल्या दहा वर्षांच्या राजकारणात तब्बल ६ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भुतिया यांने म्हटले आहे की, “सर्वप्रथम, मी पीएस तमांग आणि सिक्कीम क्रांतिकारी पक्षाने २०२४ च्या सिक्कीम विधानसभा निवडणुका जिंकल्याबद्दल अभिनंदन करू इच्छितो आणि मला आशा आहे की पक्षाने निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करेल आणि सिक्कीमला सर्व क्षेत्रात नवीन उंचीवर नेईल.
बायचुंग भूतिया यांनी २०११ ला आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती जाहीर केल्यानंतर २०१४ मध्ये भारतीय राजकारणात प्रवेश केला. सुरूवातीला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) नेते अशोक भट्टाचार्य यांच्या डाव्या आघाडीला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, बायचुंग भुतियाने एक निवेदन जारी करून घोषणा केली. नुकत्याच झालेल्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाईचुंग भुतिया यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भाईचुंग भुतिया यांना त्यांच्या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सहाव्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.