अमेरिकेत एका भारतीयाचा मृत्यू; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

26 Jun 2024 18:49:37
america indian attacked video viral


नवी दिल्ली :   
   अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील एका पार्किंगमध्ये भारतीयाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओक्लाहोमा येथील पार्किंगमध्ये भारतीय-अमेरिकन मोटेल मॅनेजरचा अज्ञात इसमाकडून करण्यात आलेल्या हिंसक हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना २२ जून रोजी रात्री घडली असून मृत व्यक्तीचे नाव हेमंत शांतीलाल मिस्त्री(५९) असे आहे.




दरम्यान, मिस्त्री यांना अज्ञात व्यक्तीने धक्काबुक्की करत मेकॅनिकने त्या व्यक्तीला त्याचे सामान मोटेलच्या समोरून काढण्यास सांगितले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यात हल्लेखोर मेकॅनिकशी वाद घालताना आणि त्याच्यावर अचानक हल्ला करताना दिसून येत आहे. रिचर्ड लुईस(हल्लेखोर)ने मिस्त्री यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारुन जमिनीवर पाडले आहे. त्यानंतर हल्लेखोराने हल्ला करत घटनास्थळावरून पळ काढला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ४१ वर्षीय रिचर्ड लुईसला दक्षिण मेरिडियन अव्हेन्यूच्या १९०० ब्लॉक येथे असलेल्या हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. क्रूर हल्ल्यात मिस्त्री जमिनीवर बेशुद्ध पडल्यानंतर लुईसने घटनास्थळावरून पळ काढला. ओक्लाहोमा शहर पोलिस विभागाला रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन कॉल आला. त्यानंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच त्यांना मिस्त्री बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. रुग्णालयात दाखल करताच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.




Powered By Sangraha 9.0