आगामी काळात आशिया व युरोपात नेटफ्लिक्स विनामूल्य पाहता येणार?

26 Jun 2024 14:51:48

netflix
 
मुंबई:ओटीटी विश्वातील बदलती समीकरणे लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने आशिया, युरोप बाजारात अँड फ्री योजना आणण्याचे ठरवले आहे. तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.यामध्ये आगामी काळात प्रेक्षकांना नेटफ्लिक्स ग्राहकांना विनामूल्य बघता येणार आहे. मात्र यामध्ये जाहिरातीचा भरणा असणार आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे कंपनीने या क्षेत्रातील बाजारांचा अभ्यास करत हे मोठे पाऊल उचलले आहे.
 
अनेक ओटीटी कंपन्यानी आपले अँड सपोर्टेड प्लानची सुरूवात केल्यानंतर नेटफ्लिक्सनेही आपला ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे कळत आहे. विशेषतः घरगुती कंपन्यांच्या वाढत्या आव्हानांमुळे गेले काही दिवस अमेझॉन मिनी टिव्ही, व इतर कंपन्यांनी आपले विनामूल्य कंटेंट प्रदर्शित करण्यास सुरूवात केली होती. याच पावलावर पाऊल ठेवून कंपनीने हा संकल्प केला आहे.
 
यामुळे नेटफ्लिक्सवर कंटेंट प्रेमींना विनामूल्य कंटेंट पाहता येणार आहे. याखेरीज कंपनीने स्वतःचे जाहिरात तंत्रज्ञान व्यासपीठ बाजारात आणण्याचे ठरवले आहे. ते २०२५ ला शेवटी येणे अपेक्षित आहे. यापूर्वी कंपनीने विनामूल्य कंटेंट लागू केलेल्या देशात नवीन दर्शक मिळवण्यास नेटफ्लिक्सला मोठा फायदा झाला होता. कंपनीच्या माहितीप्रमाणे, जवळपास ४० टक्क्यांनी गाहकांची संख्या यामुळे वाढली होती. तोच फंडा भारत व इतर राष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0