जलजन्य आजारांबाबत पालिकेकडून जागरुकता मोहिम!

26 Jun 2024 18:21:48
BMC News Waterborne disease


मुंबई :
मुंबई महापालिकेच्या एन विभागाकडून पावसाळी आजारांबाबत जनजागृती मोहिम राबवली जात आहे. यासाठी घाटकोपरमधील गणेश नगर, लक्ष्मीबाग येथे आरोग्य केंद्र, मलेरिया विभाग कर्मचारी आणि कीटकनाशक विभाग यांच्या सहकार्यांने दि. २६ जून रोजी जनजागृती मोहिम राबवण्यात आली. दरम्यान मलेरिया विभागाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी रक्त तपासणीसाठी नमुने घेतले. तसेच जलजन्य आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एन विभागात ठिकठिकाणी पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत.





Powered By Sangraha 9.0