सुनीता विल्यम्स अवकाशात अडकली; फक्त २७ दिवसांचा इंधनसाठा उपलब्ध!
25 Jun 2024 17:26:33
नवी दिल्ली : स्टार कॉलिनियर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण तीनदा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दि. ०५ जून रोजी स्टारलाईनर या स्पेसक्राफ्टमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून यान परत पृथ्वीच्या दिशेने परतताना तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यानात फक्त २७ दिवसांचे इंधन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, १३ जून रोजी स्पेस स्टेशनवरून प्रक्षेपण होणार होते. परंतु, यानातील तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण करण्यात अडथळा येत आहे. या तांत्रिक विलंबामुळे अंतराळवीर सुनीता विल्यम्स व सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर दोघेही अंतराळात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ०५ जून रोजी कॉलिनियर स्पेसक्राफ्टद्वारे स्टार स्पेसमधून दोन्ही अंतराळवीर स्पेस स्टेशनसाठी यानातून प्रक्षेपित करण्यात आले.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह अवकाश यान पृथ्वीवर कधीपर्यंत परतणार?, याबाबत अमेरिकन स्पेस एजन्सी नासाकडे कोणतीही माहिती नाही. स्टारलाइनरच्या हेलियमच्या गळतीमुळे यानाच्या प्रक्षेपणात विलंब होत आहे. सीबीएस न्यूजने अहवालात दावा केला आहे की, नासा आणि बोईंग या दोन्ही एजन्सींना यासंदर्भात कुठलीही प्राथमिक माहिती नव्हती. परिणामी, यान पृथ्वीच्या दिशेने येण्यास विलंब झाला आहे.
यानाच्या प्रक्षेपणात अनेकदा तांत्रिक बिघाड!
नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण पुन्हा एकदा रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टची अंतराळ मोहीत पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाणार गेल्या आहेत.
दरम्यान, बोईंग स्टारलाईनर अवकाश मोहिम काही मिनिटे बाकी राहिले असताना रद्द झाली असून स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिम पुढे ढकलण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे मागील वेळेसही मोहिम पुढे ढकलण्यात आली होती. एकंदरीत, नियोजित वेळी स्टारलाइनर लॉन्च केले जाणार नाही, असे नासाकडून शनिवारी जाहीर करण्यात आले होते.