रोहिंग्या आणि बांगलादेशींना घुसखोरी करण्यास मदत; एनआयएने जलील, अन्वर हुसैन यांच्याविरोधात दाखल केले आरोपपत्र

25 Jun 2024 12:46:51
 nia
 
दिसपूर : बनावट कागदपत्रांचा वापर करून रोहिंग्या आणि बांगलादेशींची भारतात तस्करी करणाऱ्या आठ जणांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवार, दि. २४ जून २०२४ आरोपपत्र दाखल केले. एनआयएने जलील मिया, हनन मिया, फरारी काजल सरकार, अधीर दास आणि अन्वर हुसैन उर्फ मामा यांच्याविरुद्ध आसामाच्या गुवाहाटी येथील विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व आरोपी त्रिपुरातून काम करत होते.
 
आरोपपत्रात समाविष्ट असलेल्या इतरांची ओळख फरारी कमल दास, आरोपी अमोल चंद्र दासचा भाऊ, जो सिलचर येथून कार्यरत होता, बंगालस्थित लिटन चक्रवर्तीचे नाव देखील एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात आबे. आठवा आरोपी बांगलादेशी नागरिक राबिल हसन उर्फ रबिउल हसन आहे.
 
हे वाचलंत का? -  अल्पवयीन मुलाने केली ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या; वडिलांच्या सांगण्यावरुन हत्या? ईशनिंदा केल्याचा होता आरोप
 
एनआयएच्या तपासानुसार, लिटन चक्रवर्ती हा गुप्त मार्गाने बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांवर भारतीय ओळखपत्र तयार करायचा. आसाम, बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींशी रबीउल हसनचे चांगले संबंध असल्याचे त्यात म्हटले आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे हे आरोपी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करायचे.
 
 
Powered By Sangraha 9.0