IPO Update: उद्यापासून 'हे' दोन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल

25 Jun 2024 12:36:42

IPO
 
मुंबई: उद्यापासून व्रज आयर्न अँड स्टील लिमिटेड व डिनस्टेन टेक लिमिटेड या दोन कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे.जाणून घ्या दोन्ही आयपीओविषयी माहिती...
 
१) Vraj Iron and Steel Limited- या कंपनीचा आहे २६ ते २७ जून काळात बाजारात दाखल होणार आहे.भागभांडवल धारकांना समभागाचे वाटप १ जुलैपासून पात्र गुंतवणूकदारांना करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपी ओ साठी प्राईज बँड १९५ ते २०७ रुपये निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना ७२ समभागांचा एक गठ्ठा (Lot) घ्यावा लागणार आहे. तसेच गुंतवणूकदारांना कमीत कमी १४०९०४ रुपयांची गुंतवणूक बाजारात करावी लागणार आहे.
 
आयपीओसाठी Aryaman Financial Services Limited ही कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २ जुलैपासून मिळणार आहे. ३ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. एकूण आयपीओपैकी गुंतवणूकीचा ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे.३५ टक्के वाटा किरकोळ ( Retail) गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे तर १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे.
 
गोपाल स्पोंगे,पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, वी ए ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, व विजय जानवर हे कंपनीचे प्रमोटर ( प्रवर्तक) आहेत. २००४ साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनी आयर्न, टीएमटी बार, टीएमटी बार इत्यादींचे उत्पादन करते. आर्थिक वर्ष २०२२- २३ दरम्यान कंपनीच्या महसूलात २४.८७ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीच्या करोत्तर नफ्यात ८८.१२ टक्क्यांनी वाढ झाली होती. ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला ५१७.४२ कोटींचा महसूल मिळाला होता.३१ डिसेंबर २०२३ मध्ये घसरत ३०४.८१ कोटींवर पोहोचले आहे. ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीचा करोत्तर नफा ५४ क़ोटीवरुन घसरत ४४.५८ कोटीवर पोहोचले होते. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ६८२.७४ कोटी रुपये आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्च करण्यासाठी, थकीत देयासाठी,व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.
 
२) Diensten Tech Limited- या कंपनीचा आयपीओ २६ ते २८ या काळात बाजारात गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड ९५ ते १०० प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांसाठी १२०० समभागांचा गठ्ठा (Lot) उपलब्ध असेल. कमीत कमी गुंतवणूकदारांना १२०००० रुपयांची गुंतवणूक या आयपीओसाठी करावी लागणार आहे.
Corporate Professionals Capital Private limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहिल तर Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार इ. मार्केट मेकर म्हणून Share India Securities कंपनी काम पाहणार आहे.
 
अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २ जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी तर ३५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांच्यासाठी राखीव वाटा ठेवण्यात आला आहे. आयपीओआधी कंपनीने अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून ६.२८ कोटी निधी उभारला होता.
 
ही कंपनी २००७ साली स्थापन झाली होती. मुख्यतः ही कंपनी आयटी सेवा, सुविधा पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान कंपनीच्या महसूलात ४८१३.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात १००.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीला ३७६०.३१ कोटींचा महसूल मिळाला असून ३१ डिसेंबर २०२३ मध्ये घसरण होत २६२०.९२ कोटींवर पोहोचलेआहे. करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ पर्यंत १६.०६ कोटींवर पोहोचला होता जो वाढून १७१.७० कोटींवर पोहोचला आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर थकीत देये देण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी, इश्यू संबंधित खर्चासाठी करण्यात येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0