नोकियाकडून ९० च्या दशकातील जुन्या आठवणी जाग्या,३२१० फोन आजपासून नव्या स्वरूपात बाजारात उपलब्ध !

25 Jun 2024 17:48:37

nokia
 
मुंबई:भारतात जुना आयकॉनिक नोकिया फोन नव्या स्वरूपात येणार आहे. HMD कंपनी नोकियाचे नवे फोन लाँच भारतात करणार आहे. यामध्ये विशेषतः फायदा म्हणजे अंतर्गत प्री इन्स्टॉल केलेले युपीआय अँप फिचर असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याला मान्यता दिली असल्याने कंपनीच्या २५ व्या वर्धापनदिना निमित्ताने हा नोकिया ३२१० फोन नव्या स्वरूपात येणार आहे.
 
याआधी हा फोन प्रथमच १९९९ साली भारतात आला होता. नोकिया बरोबर हातमिळवणी करत फिनीश या स्टार्टअप कंपनीने नोकिया २३५ ४ जी, नोकिया २२० ४ जी हे फोन बाजारात आणले आहेत. नोकिया १३२० हा फोन १४५० एम एच बँटरीसह येतो‌. ज्या फोनची बॅटरी क्षमता नऊ तासांपर्यंत चालण्याची आहे. या छोट्या फोनमध्ये २ मेगा पिक्सेल कॅमेरा फिचर व टॉर्च देखील असणार आहे. आजच या फोन लाँचची घोषणा करण्यात आली असून या फोनमध्ये खास आकर्षण म्हणजे युट्यूब, युट्यूब म्युजिकचाही समावेश असणार आहे.
 
नोकिया ३२१० मध्ये आठ अँप्स चालू शकतात. ज्यामध्ये वेदर, न्यूज, सोकोबन, क्रिकेट स्कोअर, २०४८ गेम, टेरिस या अँपचा समावेश फोनमध्ये आहे. नोकिया २२० ४ जी फोनमध्ये २.८ इंचाचा डिस्प्ले असुन २ मेगा पिक्सेलचा कॅमेरा फिचर आहे. याशिवाय युएसबी टाईप सी चार्जिंग सपोर्ट आहे. HMD कंपनीच्या वेबसाइटवर हे फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अमेझॉनवर, व रिटेल दुकानात देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. नोकिया २३५ ४ जी ची किंमत ३७४९ व नोकिया २२० ४ जी ३२४९ रुपयांना तर नोकिया ३२१० फोन ३९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे.
 
Powered By Sangraha 9.0