मंत्रिमंडळ विस्ताराकरिता खलबतं; मुख्यमंत्र्यांनंतर आता आणखी एक बडा नेता दिल्लीत!

24 Jun 2024 15:40:35
cabinet state leader delhi tour


नवी दिल्ली : 
     राज्यातील नेत्यांचे दिल्ली दौरे वाढताना दिसत असून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार दौरा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकट्याने हा दौरा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीत अचानक केलेला दौरा यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आले आहे. दिल्ली दौऱ्यात नेत्यांशी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे देखील दिल्ली दौरा करणार आहेत. अजित पवार यांच्या दौऱ्यात कुणाला मंत्रीपदी संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

दरम्यान, राज्यातील महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी याआधीदेखील दिल्लीचा दौरा केल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हेदेखील दिल्ली दौरा करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दि. २३ जूनच्या रात्रीच शिंदे यांनी दौरा केला आहे. विशेष म्हणजे दिल्ली दौऱ्यात घेतलेल्या भेटीगाठी आटोपून नागपुरात पोहोचले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाची भेट घेतल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्ली दौऱ्यात पाहायला मिळाले आहेत. परंतु, यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र दौरा केल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा रंगली आहे. महायुती सरकारचाय मंत्रीमंडळ विस्तार होणार असून कुणाची वर्णी मंत्रीपदी लागणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Powered By Sangraha 9.0