भंडारा : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी भंडारा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे उद्धाटन केले. नरेंद्र भोंडेकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. तसेच भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले.
हे वाचलंत का? - १०२ कोटी रुपयांच्या जलपर्यटन प्रकल्पाचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्धाटन!
नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडावेळी त्यांना साथ दिली होती. त्यानंतर २०१९ ला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. आता त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांना साथ दिली आहे. सोमवारी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.