swati maliwal case : बिभव कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ!

22 Jun 2024 16:37:37
swati maliwal case


नवी दिल्ली :   
  आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मलिवाल मारहाण प्रकरणी(swati maliwal case )नवी अपडेट समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बिभव कुमार यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने दि. ०६ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

स्वाती मालीवाल यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांना मोठा झटका दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दि. ३१ मे रोजी चौकशी केल्यानंतर कुमार यांची रवानगी कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आता सुनावणी झाल्यानंतर महानगर दंडाधिकारी गौरव गोयल यांनी कोठडीत वाढ केली आहे.

दरम्यान, पुढील सुनावणीस आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, याआधी सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीच्या अर्जावर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचे निर्देश दिले होते. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर आरोपीला १८ मे रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.



Powered By Sangraha 9.0