मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ट्रक, सीआरपीएफ वाहन आगीनंतर नवी माहिती समोर
22-Jun-2024
Total Views | 59
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मैतेई व कुकी समुदायात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मणिपरमध्ये कुकी समुदायाकडून एका ट्रकला आग लावण्यात आली असून ट्रकचा मालक मैतेई असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ट्रक वाहन जाळण्याआधी सीआरपीएफ बसदेखील जाळण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, इतर लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली असली तरी आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. घटना रात्री घडल्याने अंधाराचा फायदा उठवत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी कांगपोकपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ट्रकचा मालक मेईतेई समाजाचा असल्याची माहिती मिळताच गुन्हा दाखल केला. आगीची घटना मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग-२ वरील ॲलेक्स फार्म येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ट्रकला आग लावण्यात आली.