रोहित असल्याचे भासवत शाहरुखने रचला लव्ह जिहादचा डाव!

22 Jun 2024 12:08:12
Madhya Pradesh Love Jihad case

भोपाळ
: मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्याच्या सादलपूरमध्ये शाहरुखने रोहित असल्याचे सांगून एका तरुणीशी मैत्री केली. दरम्यान तरुणीवर धर्मांतर करून निकाह करण्याची जबरदस्ती ही शाहरुखने केली. त्यावेळी पीडितेने पोलिस स्टेशनमध्ये शाहरुखविरोधात एफआयआर दाखल केली. ज्यामुळे शाहरुख आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

मैत्री झाल्यानंतर शाहरुखने पीडितेचे फोटो एडिट करून सोशलमीडियावर टाकण्याची धमकी ही दिली होती. तो पीडितेवर भेटण्यासाठी , बोलण्यासाठी दबाव टाकत होता. दरम्यान आरोपीने पीडितेवर धर्मांतरासाठी ही जबरदस्ती केली. पीडिता दि. २० जून २०२४ रोजी सायंकाळी मेडिकल स्टोरमध्ये गेली होती. ते मेडिकल जुनैद नावाच्या एका व्यक्तीचे आहे. तो शाहरुखचा मित्र असल्याची माहिती आहे. दरम्यान शाहरुख ही मेडिकल स्टोरवर आला. तसेच त्याने पीडितेवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. तेव्हा पीडिता बचावासाठी जोराजोरात आरडाओरडा करायला लागली. त्याचवेळी तिथे आलेल्या हिंदू संघटनेच्या लोकांनी तिची सुटका केली. तसेच तक्रार दाखल करायला पीडितेला मदत केली.


Powered By Sangraha 9.0