सरकारी नोकरी करताय जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट, केंद्राचा मोठा निर्णय!

22 Jun 2024 15:55:52
Central government servant new rule
 

नवी दिल्ली :      केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग(डीओपीटी)कडून नवा आदेश जारी करण्यात आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त १५ मिनिटांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध करण्यात आला आहे. सरकारी कार्यालये सुरु होण्याची वेळ सकाळी ९ वाजता असून त्यानंतर ०९:१५ पर्यंत अतिरिक्त वेळ उपस्थितीकरिता मिळणार आहे. १५ मिनिटांनंतर कार्यालयात उपस्थित राहिल्यास अर्ध्या दिवसाची रजा ग्राह्य धरली जाईल.

दरम्यान, मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर २०१४ पासून ही जुनी परंपरा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात सरकारला यश मिळाले असून कोविडच्या आगमनामुळे सरकारी कर्मचारी पुन्हा व्यस्त झाले होते, मात्र आता त्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचावे लागेल आणि वेळेवर निघावे लागेल, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. १५ मिनिटांचाही विलंब झाल्यास अर्ध्या दिवसाची रजा कापली जाईल.

केंद्र सरकारने २०१४ पासून ही जुनी परंपरा संपवण्याचा प्रयत्न करत त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, कोविडच्या काळात सरकारी कर्मचारी पुन्हा व्यस्त झाल्याचे पाहायला मिळाले मात्र आता त्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचावे लागेल आणि वेळेवर निघावे लागेल, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. १५ मिनिटांचाही विलंब झाल्यास अर्ध्या दिवसाची रजा कापली जाणार आहे. विशेष म्हणजे नवा आदेश सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठांसाठी लागू करण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0