२४ जूनपासून गुंतवणूकदारांसाठी चार कंपन्याचे आयपीओ बाजारात, जाणून घ्या कुठले आयपीओ व त्याची इत्यंभूत विस्तृत माहिती

21 Jun 2024 15:36:13

IPO
 
मुंबई: २४ तारखेला तीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहेत. शिवालिक पॉवर कंट्रोल (Shivalic Power Control), सिल्व्हन प्लायबोर्ड इंडिया (Sylvan Plyboard India), मासन इन्फ्राटेक लिमिटेड (Mason Infratech Limited), विसमन ग्लोबल सेल्स लिमिटेड (Visman Global Sales Limitedl) या चार कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होईल.
 
या आयपीओविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती -
 
१) Shivalic Power Control Limited - शिवालिक पॉवर कंट्रोल कंपनीचा आयपीओ २४ ते २६ या काळात गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. आयपीओतील समभागाचे वाटप २७ जूनपासून करण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा आयपीओ (IPO) एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. १ जुलैपासून कंपनी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
 
कंपनीने आयपीओसाठी ९५ ते १०० रुपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला आहे. १२०० समभागांचा एक गठ्ठा (Lot) गुंतवणूकदारांना उपलब्ध असेल. गुंतवणूकदारांना कमीत कमी १२०००० रुपयांची गुंतवणूक आयपीओसाठी करावी लागणार आहे.Corporate Capitalventures Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Skyline Financial Services Private limited कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे तर मार्केट मेकर म्हणून SS Corporate Securities कंपनी काम पाहणार आहे.
 
अपात्र झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा जून २८ पर्यंत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच १ जुलैपासून कंपनी एनएसई एसएमई अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. एकूण आयपीओतील ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) साठी उपलब्ध असणार आहे. तर रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के वाटा उपलब्ध असेल तर १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. आयपीओआधी कंपनीने अँकर गुंतवणूकदार (Private Investors) कडून १८.२९ कोटींची गुंतवणूक मिळवली आहे. तर कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) अमित कन्वर जिंदाल, सपना जिंदाल आहेत.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी २००४ साली स्थापन झाली होती. इलेक्ट्रिक पॅनल, पीसीसी पॅनल, स्मार्ट पॅनल संबंधित उत्पादने व सेवा कंपनी पुरवते. कंपनीला ३१ मार्च २०२३ व ३१ मार्च २०२२ दरम्यान ४४.०३ टक्क्यांनी कंपनीच्या महसूलात वाढ झाली होती. तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) ३०९.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या महसूलात ८२६९.३९ कोटीवरून आर्थिक वर्ष ३१ डिसेंबर २०२३ मध्ये घसरण होत ६३७९.१६ कोटींवर पोहोचले होते. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) २४१.१६ लाख कोटी रुपये आहे. आयपीओमध्ये कंपनीने मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, भांडवली खर्चासाठी, नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी, वेअरहाऊस बांधकामासाठी, विस्तारीकरणासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
 
२) Sylvan Plyboard - सिल्व्हन प्लायबोर्ड इंडिया कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २४ जूनपासून बाजारात दाखल होत आहे. २४ जून ते २६ जून काळात हा गुंतवणूकीसाठी खुला असेल. हा आयपीओ एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. गुंतवणूकीसाठी ४००० समभागांचे एकूण दोन गठ्ठे (Lot) उपलब्ध असतील. गुंतवणूकदारांना आयपीओ साठी कमीत कमी २२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.Finshore Management Services Limited ही कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी रजिस्ट्रार म्हणून आयपीओसाठी काम पाहणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Black Fox Financial कंपनी काम पाहणार आहे.
 
कंपनीच्या समभागाचे वाटप २७ जूनपासून करण्यात येणार आहे. तर अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २८ जूनपासून होऊ शकतो. १ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे तर ५० टक्के वाटा इतर गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. सिंह सप्लायर्स प्रायव्हेट लिमिटेड, आनंद कुमार सिंह, जयप्रकाश सिंह, शकुंतला सिंह, कल्याणी सिंह हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत.
 
ही कंपनी २०२२ साली स्थापन झाली होती. ही कंपनी विविध प्रकारच्या लाकडाचे उत्पादन सेवा व सुविधा पुरवते. कंपनींच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ व ३१ मार्च २०२३ दरम्यान कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये १५.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये १५.५७ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीच्या माहितीप्रमाणे, ३१ मार्च २०२३ मध्ये कंपनीला १९९१५.३२ कोटींचा महसूल मिळाला होता जो ३१ मार्च २०२३ पर्यंत घसरत १६१९३.२४ कोटींवर पोहोचला होता. कंपनीच्या निव्वळ करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील ३५२.८५ कोटींच्या तुलनेत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढ होत ४४७.९८ कोटींवर पोहोचला होता.
 
कंपनीचे बाजार भांडवल १०६.५६ कोटी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, भांडवली खर्चासाठी, इश्यू खर्चासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
 
 
३) Masan Infratech Limited - मासन इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ २४ ते २६ जून कालावधीत येणार आहे. २७ जूनपासून कंपनीच्या समभागाचे वाटप अपेक्षित आहे. एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात हा आयपीओ नोंदणीकृत होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड प्रति समभाग ६२ ते ६४ रुपये निश्चित केला आहे. आयपीओसाठी २००० समभागांचा गठ्ठा (Lot) घेणे आवश्यक असेल. गुंतवणूकदारांना आयपीओसाठी कमीत कमी १२८००० रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक ठरणार आहे. Expert Global Consultants Private limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Globalworth Securities कंपनी काम पाहणार आहे.
 
आयपीओसाठी अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २८ जूनपासून करण्यात येणार आहे. तर एकूण आयपीओपैकी ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना उपलब्ध असणार आहे तर ३५ टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध व १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. असित ठक्कर दत्तानी, आशुतोष जुथानी, स्मित ठक्कर दत्तानी हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत. ही कंपनी २०२० साली स्थापन झाली होती. मुख्यतः ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये सेवा सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत आहे.
 
कंपनीच्या माहितीप्रमाणे, ३१ मार्च २०२२ व ३१ मार्च २०२३ या कार्यकाळात कंपनीच्या महसूलात ११२.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात १२१.५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.३१ मार्च २०२३ मधील कंपनीच्या महसूलात ६४०५.५१ कोटींच्या तुलनेत घट होत ५६९०.४६ कोटी पर्यंत घसरण झाली आहे. करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०२३ मधील ३३७.०१ कोटीवरुन वाढत ५०९.०१ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल ११२.४६ कोटी रुपये आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
 
४)Visaman Global Sales Limited - विसाहन ग्लोबल सेल्सचा आयपीओ २४ जून ते २६ जून काळात बाजारात येणार आहे. या आयपीओतून ३७.३२ कोटींचे फ्रेश इश्यू बाजारात आणले जाईल. एनएसई एसएमई अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. १ जुलैपासून कंपनी सूचीबद्ध होणार आहे. गुंतवणूकीसाठी ३००० समभागांचा गठ्ठा (Lot) उपलब्ध असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी १२९००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
 
Shreni Shares Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे यक्ष Link Intime India कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम करत आहे तर मार्केट मेकर म्हणून Shreni Sales कंपनी काम पाहणार आहे. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २८ जूनपासून करण्यात येणार आहे. मितुलकुमार वसा, सुरेशचंद्रा वसा, अवनी वसा, इलाबेन वसा, कुलर ब्रिजेश हे कंपनीचे प्रमोटर (प्रवर्तक) आहेत.
 
२०१८ साली ही कंपनी स्थापन झाली होती. कंपनी पाईप व तत्सम पदार्थांची विक्री करते व सेवा सुविधा पुरवते. कंपनीच्या माहितीप्रमाणे, ३१ मार्च २०२३ व ३१ मार्च २०२२ अंतर्गत कंपनीच्या महसूलात १६.०४ टक्क्यांनी वाढ झाली तर करोत्तर नफ्यात १९.७२ टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनींच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ व ३१ मार्च २०२३ दरम्यान कंपनीच्या महसूलात ३१ मार्च १०२३ मधील ३७६०५.०१ कोटी गुंतवणूक ३१ डिसेंबर २०२३ मध्ये घटला आहे. तर ३१ मार्च २०२३ मधील ११३.३३ कोटींच्या तुलनेत घसरत ३१ डिसेंबर २०२३ मध्ये १०१.६१ कोटी झाला होता.
 
कंपनीचे एकूण बाजार भांडवल ५९.३९ कोटी रुपये आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर भांडवली खर्च करण्यासाठी, वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0