अखेर सेबीची ओला इलेक्ट्रिक ५००० कोटींच्या आयपीओला मान्यता !

21 Jun 2024 11:55:37

IPO
 
मुंबई: सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने भारतातील प्रथम व सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. प्रथमच इलेक्ट्रिक वाहनातीर आयपीओ बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील महिन्यात ओलाने सेबीकडे डीआरचपी (Draft Red Herring Prospectus) म्हणजेच अर्ज केला होता. त्याला मान्यता दिल्याने ऑफर फॉर सेलसह ५०० कोटींचा आयपीओ बाजारात येणार आहे.
 
कंपनीने आयपीओतील माध्यमातून ६ अब्ज डॉलर उभे करण्याचे ठरवले होते.कंपनीचे प्रवर्तक (Promoter) भाविश अग्रवाल हे आपला ४.७ कोटींचा हिस्सा ऑफर फॉर सेलमार्फत विकणार आहेत. एकूण समभागापैकी हा ५० टक्के वाटा असणार आहे. SoftBank Vision Fund, Tiger Global व इतर गुंतवणूकदार या ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये सहभागी होतील.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओआधी कंपनीने प्री आयपीओ खाजगी प्लेसमेंट मार्फत १००० कोटी गोळा करण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. अँकर (Private) म्हणजेच खाजगी गुंतवणूकदारांकडून ही रक्कम गोळा केल्यास मुख्य आयपीओतील फ्रेश इश्यू समभागात घट होऊ शकते. लवकरच कंपनीकडून सांगण्यात आल्याप्रमाणे नवीन उत्पादनेही बाजारात आणली जाणार आहेत.DHRP मधील माहितीनुसार, आयपीओ निधीचा वापर भांडवली खर्च उभारण्यासाठी केला जाणार आहे.तसेच आर अँड डी (Research and Development), थकीत देये देण्यासाठी करण्यात येणार आहे.
 
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाली होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ३७३.४ कोटींच्या तुलनेत वाढत २६३०.९ कोटींवर पोहोचला होता. तसेच कंपनीला नुकसान सहन करावे लागले होते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीला १४७२ कोटींचे नुकसान झाले होते जे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७८४.१ कोटींचे झाले होते.
 
प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, एकूण निधीतील १२२६ कोटी भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure), ८०० कोटी रुपये थकित देये देण्यासाठी तसेच रिसर्च व डेव्हलपमेंटवर १६०० कोटी व कंपनीच्या वाढीसाठी ३५० कोटी रुपये खर्च होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0