दिपक पारेख समर्थित नेफ्रो केअर आयपीओतून ' इतके ' कोटी उभारणार

21 Jun 2024 13:08:43

ip
 
मुंबई: दिपक पारेख समर्थित नेफ्रो केअर (Nephro Care) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात येणार आहे. या आयपीओतून कंपनीचे ४० कोटी उभारण्याचे लक्ष आहे. कलकत्ता येथे १०० बेडचे विवासिटी (Vivacity) मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी कंपनीने निधी उभारणी करण्याचे ठरवले होते. तसेच इतर खर्चासाठी या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर केला जाऊ शकतो.
 
यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीने आयपीओपूर्व फेरीत निधी उभारणी केली होती. ज्यामध्ये एचडीफसी बँकेचे माजी चेअरमन दिपक पारेख, एचडीएफसी सिक्युरिटीजचे चेअरमन भरत शहा व मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल (Macleods Pharmaceuticals) कंपनीचे संस्थापक व कार्यकारी संचालक राजेंद्र अग्रवाल यांनी गुंतवणूकीत भाग घेतला होता. आता कंपनीने आयपीओतून निधी करण्यासाठी ठरवले आहे.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इस्पितळात १०० बेड व ३० क्रिटिकल केअर बेडचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये आयसीयु, एचडीयु, आरटीयु, एनआयसीयु सुविधांचा समावेश असेल. विवासिटी पूर्व भारतातील प्रगत मूत्रपिंड प्रत्यारोपण युनिटसह कार्डिओलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, स्त्रीरोग आणि इतर अनेक विषयांमध्ये उपचार सेवा प्रदान करेल असे कंपनीने जाहीरनाम्यात म्हटले आहे.
 
कंपनीने आर्थिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये १९.९० कोटींचा महसूल मिळवला होता तर पहिल्या नऊ महिन्यांत ३.४ कोटींचा निव्वळ नफा मिळवला होता. नेफ्रो केअरची स्थापना नेफ्रोलॉजिस्ट प्रतिम सेनगुप्ता यांनी कलकत्ता येथे केली होती.
 
Powered By Sangraha 9.0