शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार आरोग्य योजनांचे लाभ!

20 Jun 2024 11:44:45
 
Mahayuti
 
मुंबई : शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना या आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे. 
 
राज्यातील महायुती सरकारने शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी अतिशय महत्वाचे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे पाऊल उचलले आहे. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या दोन्ही योजनांच्या लाभार्थी घटकांमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (लिंक)करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी आरोग्य सुविधांचा मार्ग मोकळा झाला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0