सुनीता विल्यम्स यांच्या अवकाश भरारीत पुन्हा एकदा विलंब!

02 Jun 2024 19:38:16
sunita williams boing starliner


नवी दिल्ली : 
   नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण पुन्हा एकदा रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टची अंतराळ मोहीत पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाणार आहेत.

दरम्यान, बोईंग स्टारलाईनर अवकाश मोहिम काही मिनिटे बाकी राहिले असताना रद्द झाली असून स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिम पुढे ढकलण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील वेळेसही मोहिम पुढे ढकलण्यात आली होती. एकंदरीत, नियोजित वेळी स्टारलाइनर लॉन्च केले जाणार नाही, असे नासाकडून शनिवारी जाहीर करण्यात आले.

आता स्पेसक्राफ्टचे पुढील प्रक्षेपण स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी १०:५२ मिनिटांनी होणार आहे. तथापि, नासाने अंतराळ यान प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करतील की नाही हे निश्चित केलेले नाही. तसेच, येत्या ०६ जूनला आणखी एक राखीव दिवस लॉन्चिंगसाठी नियोजित करण्यात आला आहे.

बोईंग स्टारलाईनर प्रक्षेपित करून अंतराळवीर व कार्गो अंतराळ स्थानकावर पोहोचवण्यासाठी नासाने अंतराळयान नियमित ऑपरेशनसाठी तयार असल्याने यशस्वी प्रक्षेपणाच्या माध्यमातून सदर मिशन मैलाचा दगड असू एजन्सीसाठी असू शकते.




Powered By Sangraha 9.0