एक्झिट पोलचा कौल मोदींकडेच, सलग तिसऱ्यांदा भाजप येणार सत्तेत!

02 Jun 2024 16:42:45
exit poll bjp government
 

नवी दिल्ली :    भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) जवळपास ३६० हून अधिक जागांसह पुन्हा सत्तेत येत असून काँग्रेसप्रणित इंडी आघाडीस सुमारे १५० जागा मिळतील, असे अंदाज लोकसभा निवडणुकीनंतरच्या मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) दिसून आले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजेच सातव्या टप्प्याचे मतदान शनिवारी संपले. मतदान संपताच विविध संस्थांनी एक्झिट पोलची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. यावेळी सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित रालोआस कमीत कमी ३५० आणि जास्तीतजास्त ३७० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्याचवेळी काँग्रेसप्रणित इंडी आघाडीची कामगिरी अगदीच यथातथा झाली असून इंडी आघाडीस कमीत कमी १२० ते जास्तीतजास्त १५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


Powered By Sangraha 9.0