जावेदने स्टेटसला ठेवला कुर्बानीचा फोटो; हिंदू संघटनांकडून गोवंशाच्या हत्येचा आरोप!

19 Jun 2024 19:41:51

javed put qurbani status on whatsapp


नवी दिल्ली :
हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यात बकरी ईदला गोवंशची कुर्बानी देण्यात आल्याच्या आरोपावरून जोरदार राडा झाला. हिंदू संघटनांनी आरोप केलाय की, सिरमौरच्या नाहनमधील एका तरुणाने गोवंशाची कुर्बानी दिली आहे. याप्रकरणी हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला. तसेच जावेदच्या दुकानाबाहेर आंदोलन केले. पंरतु जावेद फरार झालेला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सहानपुरमध्ये राहणारा एका तरुण गेली दीड-दोन वर्ष हिमाचल प्रदेशमध्ये रेडीमेड कपड्यांच्या विक्रीचे दुकान चालवतो. त्याने दि. १७ जून रोजी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसला एका प्राण्याच्या कुर्बानीचा फोटो लावला. जावेदने व्हॉट्सॲप स्टेटसला जो फोटो ठेवला होतो. त्यात तो कुर्बानी दिलेल्या प्राण्याच्या बाजूला चाकू घेऊन उभा होता.

दरम्यान हिंदू संघटनांनी आरोप केला आहे की, जावेदने गोवंशाची हत्या केली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाईची मागणी ही हिंदू संघटनांनी केली आहे. त्यानंतर जावेद फरार झालेला आहे. पोलिस संपुर्ण प्रकरणाची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यकर्त्यांने आरोप केला की, नाहानसह संपूर्ण हिमाचल प्रदेशात बाहेरून येणारे मुस्लिम व्यापारी चढ्या भाड्याने दुकाने घेतात.तसेच हे लोक येथील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.



Powered By Sangraha 9.0