“अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे”, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंची दमदार एन्ट्री

19 Jun 2024 16:44:58

Pravin tarade
 
 
मुंबई : मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आता थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाठली आहे. एकीकडे धर्मवीर २ ची तयारी प्रवीण तरडे करत असून दुसरीकडे ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य चित्रपटात ते विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
 
पेटा त्रिकोटी दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटा मुख्य खलनायकाची भूमिका प्रवीण तरडे साकारणार आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लूकने सगळ्यांनाच चकित केले आहे. दरम्यान, या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
 
प्रवीण तरडे यांनी पोस्ट करत लिहिले आहे की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत “ मुख्य खलनायक “ म्हणून माझा प्रवेश .. अहो विक्रमार्का मध्ये “ असुरा “ बनून येतोय तुमच्या भेटीला…मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे चित्रपट येत आहे. अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे.
 

Pravin Tarade 
 
दरम्यान, २०१८ साली प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची विदारक कहाणी मांडण्यात आली होती. याशिवाय देऊळ बंद, धर्मवीर १, धर्मवीर २, या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0