मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिस गाजवत आहे. मुळात म्हणजे या चित्रपटात कोणताही मोठा स्टार कलाकार नसूनही हा चित्रपट केवळ कंटेटच्या जोरावर सुपरहिट ठरला आहे.
७ जून रोजी हे कोकणातील हे भूत अर्थात 'मुंज्या' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता या चित्रपटाने १२ दिवसात ६५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘मुंज्या’ने पहिल्या दिवशी ४ कोटी, दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ८ कोटी, चौथ्या दिवशी ४ कोटी, पाचव्या दिवशी ४.१५ कोटी, सहाव्या दिवशी ४ कोटी, सातव्या दिवशी ३.९ कोटी, आठव्या दिवशी ३.५ कोटी, नवव्या दिवशी ६.५ कोटी, दहाव्या दिवशी ८.५ कोटी, अकराव्या दिवशी ५.२५ कोटी, बाराव्या दिवशी ३.४ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ६२.४५ कोटी कमावले आहेत.
'स्त्री', 'भेडिया'सारखे यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिनेश विजान आणि अमर कौशिक यांनी 'मुंज्या'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ, सुहास जोशी, मोना सिंह, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर, तरन सिंग, सत्यराज, खुशी हजारे, आयुष उलगड्डे, श्रुती मराठे अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.