‘चंदु चॅम्पियन’ पाहून कपिल देव झाले भावूक, अश्रु आवरत म्हणाले, “हा चित्रपट चुकवायलाच...

19 Jun 2024 13:09:08
 Kapil Dev
 
 
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन याची पर्मुख भूमिका असणारा चंदु चॅम्पियन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. भारताला पॅरालॉम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांचे जीवन या चित्रपटात दाखवले आहे. सर्वच स्तरांतून या चित्रपटाचे कौतुक होत असताना आता माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. कपिल देव अनेकदा स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटांना पाठिंबा देत असतातच. या वेळेस तर चित्रपट पाहून त्यांचे अश्रू अनावर झाले होते.
 
कपिल देव यांनी चंदू चॅम्पियनच्या टीमचे आणि विशेष कथेचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी कार्तिक आर्यन हा एक उत्तम अभिनेता असल्याचे म्हणत चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खानचं कौतुक केले आहे. कपिल देव यांनी चंदू चॅम्पियनचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "चंदू चॅम्पियन! निश्चितपणे असा एक सिनेमा जो चुकवायला नको. मला स्पोर्ट्स फिल्म पाहायला आवडतात आणि मी त्यांचे कौतुक करतो, परंतु हा स्पोर्ट्स फिल्मपेक्षाही खूप काही आहे."
 

Kapil Dev 
 
ते पुढे म्हणाले की, "हे एका स्पोर्ट्स ड्रामापेक्षा बरेच काही आहे. ते पाहून मी हसलो, रडलो, अभिमान वाटला आणि मग आणखी रडलो. कबीर खानला सलाम. त्याने पुन्हा चमत्कार केला. आणखी एक चांगला चित्रपट बनवला. कार्तिक आर्यन काय उत्कृष्ठ अभिनय केला आहे. सगळे कलाकार आणि क्रूचे अभिनंदन आणि आम्हाला हा चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद!”
Powered By Sangraha 9.0