जनकल्याण बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल एल ओसवाल काळाच्या पडद्याआड

17 Jun 2024 18:01:02

Jankalyan
 
 
मुंबई: जनकल्याण सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल एल ओसवाल यांची रविवारी १७ जून रोजी प्राणज्योत मालवली आहे. ते ९५ वर्षाचे होते.व्यक्तिशः उत्तम डॉक्टर म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या मागे दोन मुली, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे. ते परळ मुंबईचे रहिवासी होते.
 
बँकेच्या स्थापनेपासून ते संस्थापक अध्यक्ष म्हणून बँकेच्या कार्यकारिणीत कार्यरत होते.१९७४ पासून सलग तीनवेळा जनकल्याण बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. विशेषतः त्यांनी जनकल्याण सहकारी बँकेच्या रिकव्हरी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते.लालबाग येथील डॉक्टरी पेक्षा सांभाळत त्यांनी बँकेचे धुरा समर्थपणे सांभाळली. डॉक्टर असताना वसंतराव भागवत व वसंतराव पटवर्धन यांच्या प्रेरणेने त्यानं जनकल्याण बँकेची स्थापना केली होती. जनसेवेच्या माध्यमातून त्यांचा अनेक लोकांशी व मान्यवरांशी ते संपर्कात आले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांची कन्या लालबाग मुंबई येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
 
उमेदीच्या काळात जनसंघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. बँकिंग सेवा सर्वसामान्य लोकांच्या कक्षेत याव्या यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सत्तरच्या दशकात सहकारी तत्त्वावर ज्या बँका सुरु झाल्या त्यात जनकल्याण बँकेचे अग्रणी नाव घेतले जाते. त्यांच्या कार्यकाळात बँकेचे विस्तारीकरण झाले होते.
 
Powered By Sangraha 9.0