'मटका किंग'मध्ये सिद्धार्थची वर्णी, नागराज मंजुळेंच्या वेब सीरिजमधून OTT वर पदार्पणासाठी सज्ज

    15-Jun-2024
Total Views |
 
Mataka King
 
 
 
मुंबई : ‘सैराट’ हा मराठी चित्रपटसृष्टीला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी आत्तापर्यंत ‘फॅंड्री’, ‘झुंड’ असे दर्जेदार चित्रपट दिले. आता वेब सीरीजच्या माध्यमातून ते ओटीटी माध्यमावर येत असून ‘मटका किंग’ ही वेब सीरीज ते दिग्दर्शित करणार आहेत. विशेष म्हणजे 'मटका किंग'मध्ये अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत मराठमोळे कलाकार झळकणार आहेत.
 
‘मटका किंग’ या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार असून अभिनेता सिद्धार्थ जाधव या वेब सीरीजच्या निमित्ताने ओटीटीवर पदार्पण करणार आहे. याशिवाय पहिल्यांदाच तो नागराज यांच्यासोबतही काम करणार असल्यामुळे नेमकी तो कोणती भूमिका साकारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
 

Mataka King 
 
नागराज मंजुळें यांचे दिग्दर्शन असलेल्या 'मटका किंग' वेब सीरिजची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर करणार आहे. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोव्हर, कृतिका कामरा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.