नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर भागातील आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. एनसीआर क्षेत्रात राजस्थान, गाझियाबाद, नोएडा येथील आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. विशेष म्हणजे पहिली घटना दिल्ली येथील वसंत विहार भागातील असून येथील एका दुकानाला लागलेल्या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली.
दरम्यान, आगीची घटना गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी येथील ट्रॉनिका सिटीच्या सेक्टर ए ३ मध्ये घडली. येथील आगीत संपत पॅकेजिंग फॅक्टरीला भीषण आग लागल्याने शेजारच्या दोन कारखान्यांनाही फटका बसला होता. तसेच, तिसरी घटना नोएडा येथे घडली कोतवाली फेज ३ परिसरात एका कारखान्याला आग लागली. नोएडामध्ये अग्निशमन विभागाच्या डझनभर गाड्यांनी तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
दिल्लीत दररोज २०० हून अधिक घटना
एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, दिल्ली अग्निशमन विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शहरातील आगीच्या घटना वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. यांसारख्या दुर्घटनांमध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २०२२-२३ मध्ये १०२९ लोकांचा मृत्यू झाला तर २१९३ लोक जखमी झाले. सन २०२१ मध्ये मृतांची संख्या ५९१ होती तर जखमींची संख्या १४२१ होती. तर २०२०-२१ मध्ये ही संख्या ३४६ मृत्यू, ११३५ जखमी झाले.