मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शुक्रवार, १४ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले जात असल्याने डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाठा सेनेची साथ सोडत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.