EPFO ने अँडव्हान्स रक्कमेची सुविधा तत्काळ बंद केली

15 Jun 2024 15:52:43

epfo
 
मुंबई: कोविड काळातील अपवादात्मक परिस्थितीतील अँडव्हान्स सुविधा ईपीएफओ (EPFO) ने काढून घेतली आहे. कोविड काळात खात्यातील पुन्हा परतावा न मिळणारा अँडव्हान्स देण्याची सुविधा ईपीएफओने सुरू केली होती. एकूण फंडाच्या ७५ टक्के वाटा मुदतपूर्व काळात काढून घेण्याची सुरूवात संस्थेने सुरू केली होती.
 
कोविड काळातील दोन्ही लाटेत ही सुविधा सुरू ठेवण्यात आली होती. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना संस्थेने निवेदनात म्हटले आहे की,'कोविड-१९ आता साथीचा रोग नाही म्हणून, सक्षम प्राधिकाऱ्याने सदर आगाऊ तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सूट मिळालेल्या ट्रस्टना देखील लागू होईल आणि त्यानुसार तुमच्या संबंधित अधिकारक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व ट्रस्टना सूचित केले जाऊ शकते.'
 
तीन महिन्यांपर्यंत बेसिक पगार व डीए मिळून होणारी रक्कम अथवा ७५ टक्के निधी काढून घेण्याची सुविधा ईपीएफओने सदस्यांना दिली होती. संस्थेने म्हटल्याप्रमाणे, आगामी 'विशेष' काळात अथवा परिस्थितीत नोंदणीदार अँडव्हान्स घेऊ शकतो मात्र त्यांच्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर व फोन क्रमांक लिंक असणे गरजेचे असणार आहे.'
 
दरम्यान कामगार व रोजगार मंत्रालयाने आगामी काळात प्रत्येक सदस्यांसाठी युएन (Universal Account Number) प्रणाली अनिवार्य करत त्यामाध्यमातून खाते संबंधित सेटलमेंट वेगवान केल्या जातील असे म्हटले होते. ईपीएफओ (EPFO)ने आधीच आजारपण, शिक्षण, लग्न आणि घरासाठी १ लाखांपर्यंतच्या ॲडव्हान्सचे ऑटो सेटलमेंट लागू केले आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ऑटो मोडवर सुमारे २५ लाख आगाऊ दावे निकाली काढण्यात आले आहेत. यामुळे क्लेम सेटलमेंटची गती वाढली आहे आणि त्यापैकी मोठ्या संख्येने आता तीन दिवसात निकाली काढल्या जात आहेत.
 
Powered By Sangraha 9.0