टीएमसी खासदार युसूफ पठाण यांचा महापालिकेच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा

14 Jun 2024 14:01:01
 pathan
 
गांधीनगर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि अलीकडेच पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकणारा क्रिकेटपटू युसूफ पठाण वादात सापडला आहे. गुजरातमधील वडोदरा येथे पठाण यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार भाजपच्या एका माजी नगरसेवकाने केली आहे. यानंतर वडोदरा महानगरपालिकेने (व्हीएमसी) पठाण यांना नोटीस बजावली आहे.
 
भाजप नेते विजय पवार यांनी व्हीएमसीच्या स्थायी समिती अध्यक्षांना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला असून युसूफ पठाण यांनी सरकारी जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याचे म्हटले आहे. महापालिकेने ती जागा परत ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर दि. ६ जून २०२४ रोजी मनपाने माजी क्रिकेटपटू आणि खासदार पठाण यांना नोटीस पाठवली आहे.
 
नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, “हे कळवायचे आहे की व्हीएमसीला मार्च २०१२ मध्ये टीपी क्रमांक २२ आणि अंतिम भूखंड क्रमांक ९० मधील ९७८ चौरस मीटर जमिनीचे वाटप करण्याची विनंती तुमच्याकडून प्राप्त झाली होती. प्रक्रियेनुसार, मूल्यांकन समितीने किमान किंमत ठरवल्यानंतर तुमचा अर्ज स्थायी समितीकडे आणि नंतर सर्वसाधारण मंडळाकडे पाठवण्यात आला.”
 
हे वाचलंत का? -  "देशातील प्रत्येक जिल्ह्यात स्लीपर सेल तयार करण्याची योजना"; NIA ने दाखल केले इसिसच्या ७ दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र
 
त्यात पुढे म्हटले आहे की, “त्यानंतर गुजरात राज्य सरकारकडे लिलावाशिवाय विशेष प्रकरणात जमीन 99 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या मंजुरीसाठी अर्ज पाठविण्यात आला. तथापि, दि. ९ जून २०१४ रोजी नगरविकास विभागाकडून प्राप्त झालेल्या उत्तरानुसार, तुम्हाला सदर जमीन भाडेपट्ट्याने देण्याची विनंती फेटाळण्यात आली.”
 
नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, “तुम्हाला एका पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली होती. तथापि, हे निदर्शनास आले आहे की तुम्ही या व्हीएमसीच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे आणि तुम्हाला हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” वास्तविक, हे प्रकरण वडोदरा येथील तांदलजा येथील शुभम पार्टी प्लॉटजवळील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाशी संबंधित आहे.
 
युसूफ पठाण यांनी त्यांच्या प्लॉट क्रमांक ९१ वर बंगला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी शेजारील प्लॉट क्रमांक ९० मागितला. महापालिका आयुक्तांच्या शिफारशीवरून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्यात आला. सुरक्षेच्या विशेष प्रकरणांमध्ये सार्वजनिक लिलाव न करता निवासी कारणांसाठी युसूफ महमूद पठाण यांना प्रति चौरस मीटर ५७,२७० रुपये दराने जमीन देण्याची शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  अपहरण, धर्मांतरण अन् निकाह! पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांकडून अल्पवयीन हिंदू मुलींवर अत्याचाराची परिसीमा
 
याव्यतिरिक्त, सरकारकडून मंजुरी मिळवण्याची आणि ९९ वर्षांच्या लीजवर सुरक्षा प्रदान करण्यासाठी सर्व अधिकार प्रदान करण्याची देखील शिफारस केली जाते. दि. ३० मार्च २०१२ रोजी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर तो सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. दि. ८ जून २०१२ रोजी महासभेने या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली.
 
महासभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र, दि. ९ जून २०१४ रोजी नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्याने हा प्रस्ताव फेटाळला. क्रिकेटपटू युसूफ महमूद पठाण यांची सार्वजनिक लिलाव न करता विशेष बाब म्हणून जमीन देण्याची विनंती राज्य सरकारने फेटाळून लावल्याचे आयुक्तांना लेखी कळवण्यात आले.
 
माजी नगरसेवक विजय पवार यांनी आता स्थायी समिती अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. जमीन वाटपाची विनंती फेटाळली असतानाही पठाण यांनी बाग आणि तबेले तयार करण्यासाठी कंपाऊंडमध्ये भिंत उभारल्याचा दावा त्यांनी केला. सरकारी परवानगीशिवाय जमीन कशी ताब्यात घेतली जाऊ शकते, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
याप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षा डॉ.शीतल मेस्त्री यांनी गुरुवार, दि. १३ जून पठाण यांच्यावर दोन आठवड्यांनंतर कारवाई होऊ शकते, असे सांगितले. पठाण यांनी दि. ६ जून रोजी नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. दोन आठवड्यांचा वेळ पुरेसा आहे, असे ते म्हणाले. टीएमसीच्या नेत्यांनी स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास समिती पुढील कारवाई करेल, असा इशाराही युसूफ पठाण यांना देण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0