पुणे : पुणे अपघात प्रकरणात आता एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या अपघातातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सँपल बदलण्याआधी तीन जणांमध्ये बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघांनाही आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया तातडीने राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, अल्पवयीन आरोपी वेदांतचे ब्लड सँपल बदलण्याआधी तिघांमध्ये बैठक झाली असल्याचे समोर आले आहे. ब्लड सँपलमध्ये फेरफार करण्याआधी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि ससून रुग्णालयातील एजंट अश्पाक मकानदार या तिघांमध्ये ही बैठक झाली होती. या तिघांनाही आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या तिघांचा ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे याच्याशी कसा संपर्क झाला? याबाद्दलचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पुण्यात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालच्या पोर्शे कारने मोठा अपघात घडला. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. आरोपी वेदांत मद्यप्राशन करुन कार चालवत होता. याप्रकरणी वेदांत अग्रवाल बालसुधारगृहात आहे तर त्याचे वडील, आई आणि आजोबा हे सध्या तुरुंगात आहेत.