मोठी बातमी! राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित

13 Jun 2024 12:43:27
 
Ajit Pawar
 
मुंबई : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोण जाणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी याबद्दलची माहिती दिली आहे.
 
माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्र्यांची काल बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सुनेत्राताई पवार यांचा राज्यसभेसाठी फॉर्म भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  नीट परीक्षा प्रकरणात विद्यार्थ्यांना दिलासा! कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर...
 
तसेच "या जागेसाठी मी, अनंत परांजपे आणि बाबा सिद्दीकी हेसुद्धा इच्छुक होते. परंतू, चर्चेनंतर आम्ही सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त अजितदादांचा नाही तर मंत्रिमंडळातील आमच्या सर्वांचा हा निर्णय आहे. मी याबाबत नाराज नाही. पक्षात सर्वांना बरोबर घेऊन चर्चा करुन निर्णय घ्यायचे असतात. हे आम्ही आज नाही तर ५७ वर्षांपासून शिकतो आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही. विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं मला वाटत नाही. त्यामुळे महायूतीतर्फे सुनेत्रा पवार सहज निवडून येतील," असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0