नवी दिल्ली : भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आतंरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधील ड्रॉप-इन पिचची चर्चा वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रिकेट विश्वात रंगली आहे. दरम्यान, भारताचा तिसरा सामना युएसएसोबत होणार असून टीम इंडिया विजयासह सुपर ८ मध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.
दरम्यान, युएसएविरुध्दच्या सामन्यात टीम इंडियाचा संभाव्य संघात बदल होण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या ऑलराऊंडर शुभम दुबे व रविंद्र जडेजाला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. युएसए संघातील भारतीय वंशाचा डावखुरा तेज गोलंदाज सौरभ नेत्रावळकर याच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.
आम्ही भारतालाच सपोर्ट करणार!
भारतीय संघाचा टी-२० विश्वचषक २०२४ तिसरा सामना युएसएसोबत असणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री ०८ वाजता सामन्याला सुरूवात होणार असून उभयंतामधील हा पहिलाच सामना असणार आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईचा सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या संघाचा एक भाग असेल. क्रिकेटची पंढरी असणाऱ्या मुंबईचा सौरभ टीम इंडियाविरुध्द नेमका कसा खेळ करतो याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.
दरम्यान, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर सौरभ नेत्रावळकर याच्या कुटुंबियांनी भाष्य केले आहे. सौरभची बहीण निधीने आनंद व्यक्त करत म्हटले की, सौरभने चांगला खेळ करावा अशी आमची इच्छा आहे. तसेच, आमचे कुटुंबीय टीम इंडियाला सपोर्ट करणार असून भारताने आजचा सामनाच नाहीतर वर्ल्डकप स्पर्धा जिंकावी, असे निधीने म्हटले आहे.