प्रदर्शनापुर्वीच कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'चे हाल; १० हजार तिकिटांचीही विक्री नाही

12 Jun 2024 14:48:23
 
Kartik Aaryan
 
 
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन अभिनित पहिला बायोपिक 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला ९ जूनपासूनच सुरुवात झाली आहे. परंतु, दोन दिवसात अपेक्षित तिकिट खरेदी न झाल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवार संध्याकाळ पर्यंत केवळ ७६२४ तिकिटांची विक्री झाली होती.
 
कबीर खान दिग्दर्शित'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे. त्यांना २०१८ साली भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. कार्तिकने या चित्रपटासाठी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केलेले देखील दिसून येत आहे.
 

Kartik Aaryan 
 
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत 'चंदू चॅम्पियन'ची ७६२४ तिकिटे पहिल्या दिवसासाठी विकली गेली आहेत. यातून या चित्रपटाची २२.६७ लाख रुपयांची कमाई झाली. सध्या २६०१ शोजसाठी तिकिटे बुक केली जात असून ब्लॉक बुकिंगचाही समावेश केला तर, या चित्रपटाने रिलीजपूर्वी आतापर्यंत एकूण ५८ लाखांची कमाई केली आहे. मात्र, अद्याप रीलिजसाठी अडीच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आगाऊ बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0