पीएसयु बँक कर्मचाऱ्यांना खुशखबर! मे ते जुलै महिन्यात वेतनाच्या 'इतका ' टक्के डीए !

12 Jun 2024 14:53:46

pay
 
 
मुंबई: पुन्हा मोदी एनडीए सरकार आल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. बँक कर्मचा ऱ्यांच्या डीएची मे, जून, जुलै महिन्यातील रक्कम घोषित झाली आहे. वेतनाच्या १५.९७ टक्के डीए आता बँक कर्मचाऱ्यांना मिळ णार आहे. तसे परिपत्रक (Circular) इंडियन बँकस असोसिएशन (IBA) ने काढलेले आहे. एनडीए प्रणित मोदी सरकार आल्या नंतर मे ते जुलै महिन्यात या तीन महिन्याच्या कालावधीसाठी हा डीए (Dearness Allowance) लागू असणार आहे.
 
प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, या परिपत्रकात 'डिअरनेस अलांऊस' मे, जुन, जुलै महिन्यासाठी वेतनाच्या १५.९७ टक्क्यांनी लागू होणार असल्याचे म्हटले आहे. १२ व्या Biprite Settlement मधील खंड १३ व खंड २ (i) अनुसार, डीए १५.९७ टक्क्यांनी मिळणार आहे ' असे म्हटले आहे.
 
डीए कसा मोजला जातो ?
 
भारतातील CPI (कनज्यूमर प्राईज इंडेक्स) बेस -२०१६= १०० अनुसार डीए वेतनावर मोजला जातो. उदाहरणार्थ तीन महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्याच्या सरासरी निर्देशांक जसे १३०, १३२,१३० याप्रमाणे काढल्यास सरासरी १८७ या प्रमाणे मोजण्यात येतो.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि ८०८८ गुणांच्या अनुषंगाने अतिरिक्त भार विलीन झा ल्यानंतर नवीन वेतनश्रेणी लागू केली जाईल, असेही संयुक्त नोटमध्ये जाहीर करण्यात आले आहे.
 
पीएसयु बँकेच्या पगारात वाढ -
 
मार्च २०२४ मध्ये पब्लिक सेक्टर बँक कर्मचाऱ्यांना १७ टक्यांची वेतनात वाढ मिळाली होती. Pay Revision ९ व्या माहितीनुसार, (Pay Slip Component) मार्फत पगारातील फेरबदल ८२८४ कोटीवर पोहोचला आहे. एकूण पब्लिक सेक्टर बँकांच्या एकत्रित खर्चाच्या हा फेरबदल खर्च १७ टक्के ठरणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0