ठाण्यात दोन तासात आठ ठिकाणी साचले पाणी!

४८. ७७ मिमी पावसाची नोंद

    11-Jun-2024
Total Views |
thane city rain



ठाणे :   
   गेले काही दिवस रात्री कोसळणाऱ्या पावसाने दुपारी दमदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासात ४८.७७ मिमी कोसळलेल्या पावसामुळे शहरात आठ ठिकाणी पाणी साचले. दरम्यान या कालावधीत झाडे पडणे,पाणी साचणे अशा एकूण २३ तक्रारी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंदविण्यात आल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

मान्सूनला सुरुवात झाल्यापासून ठाण्यात रात्रीच्या सुमारास पाऊस पडत होता. त्यामुळे रात्री गारवा आणि दिवसभर अंगातून घामाच्या धारा येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अखेर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी झाली. पहिल्या एक तासात ११.९४ मिमी पाऊस झाला. तर पुढील एक तासात ३७ मिमी पाऊस पडला.

या कालावधीत एकूण २३ तक्रारी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दाखल झाल्या. यामध्ये एक आग लागणे, ६ झाडे कोसळल्याचे, दोन ठिकाणी झाडांची फांदी पडल्याची तर प्रत्येकी एक ठिकाणी झाड आणि फांदी धोकादायक झाल्याची तसेच अन्य तीन तक्रारींसह आठ ठिकाणी पाणी साचल्याची आणि एक भलामोठा होर्डिंग हलत असल्याच्या तक्रारीचा समावेश आहे.