आता होणार भुतांचं तांडव, ‘मुंज्या’च्या स्क्रिनिंगवेळी होणार ‘स्त्री २’चा टीझर लॉन्च

    11-Jun-2024
Total Views |
 
munjya
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी भूतमय होणार आहे असंच काहीसं म्हणण्याची वेळ आली आहे. नुकताच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. आता मॅडॉकच्या मेकर्सच्याच युनिव्हर्स मधील मुंज्या या चित्रपटानंतर स्त्री २ टा ट्रेलर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा हा सिक्वेल आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचे निर्माते दिनेश विजान आणि अमर कौशिक हे एका आगळ्या वेगळ्या ट्विस्टसह टीझर लाँच करणार आहेत. 'स्त्री २' चा टीझर पाहायचा असेल तर प्रेक्षकांना 'मुंज्या' चित्रपट पाहावा लागेल, तोही चित्रपटगृहामध्ये जाऊन.
 
'स्त्री २' च्या टीझरबद्दल मेकर्सनी १० जून रोजी एका पोस्टद्वारे माहिती सोशल मीडियावर दिली होती. पोस्टमध्ये लिहिले होते की, 'स्त्री २' टीझर या शुक्रवारी म्हणजे १४ जूनला लॉन्च केला जाईल... फक्त थिएटरमध्ये. तोही 'मुंज्या'च्या स्क्रिनिंगदरम्यान...सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर नाही...'
 
स्त्री, भेडीया या युनिवर्समधील 'मुंज्या' हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा हा चौथा चित्रपट असून यात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग आणि सत्यराज यांच्या भूमिका पाहायला मिळत आहेत.‘स्त्री’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास तो ३१ ऑगस्ट २०१८ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाद्वारेच अमर कौशिक यांनी दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला होता.या चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका शहरातील नले बा (उद्या या ) या आख्यायिकेवर आधारित आहे, जी चित्रपटात 'ओ स्त्री कल आना' म्हणून बदलली आहे. त्यामुळे ‘स्त्री २’ मध्ये आथा काय ट्विस्ट असणार? श्रद्धा कपूर स्त्री होती की तिला स्त्रीची शक्ती हवी होती असे अनेक प्रश्न ‘स्त्री २’ मधून उलगडणार आहेत.