इंडी आघाडीत बिघाडी; विधानसभेकरिता काँग्रेसचा स्वबळाचा नारा!

    11-Jun-2024
Total Views |
inc opposed indi aliiance


नवी दिल्ली :
       लोकसभा निवडणूक निकालानंतर इंडी आघाडीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता पुन्हा एकदा इंडी आघाडी फुटण्याची शक्यता असून काँग्रेसने आघाडी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, दिल्लीनंतर आता हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसमधील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस-आप या आघाडीला सपशेल अपयश आल्याचे दिसून आले आहे.


दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर हरियाणा काँग्रेसकडून एकला चलोची भाषा केली जात आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते भूपिंदर सिंह हूडा यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीसोबत आघाडी फक्त राष्ट्रीय स्तरावर असून राज्य पातळीवर आपसोबत कोणतीही आघाडी नसल्याचेही हूडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हरियाणात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसकडून मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे. "काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सुमारे २० टक्क्यांनी वाढली असून आपसोबत युती केली नसून राज्यात स्वबळावर लढण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. दरम्यान, आता हरियाणामध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत 'आप'शी युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे.