अमरावती ही एकमेव राजधानी; सत्तेत येताच मोठा निर्णय!

आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची घोषणा

    11-Jun-2024
Total Views |
amaravati only sole capital


नवी दिल्ली :   
  आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच अमरावती राज्याची राजधानी असेल, असे जाहीरपणे सांगितले. तसेच, आम्ही विद्वेषाचे राजकारण न करता विधायक राजकारण करु असेही ते म्हणाले. विशाखापट्टणम ही राज्याची आर्थिक राजधानी असून राज्याच्या तीन राजधान्या करून आम्ही जनतेशी खेळू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, टीडीपीला बहुमत दिल्याबद्दल आम्ही रायलसीमाचा विकास करु अशी ग्वाही चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या १६४ जागांवर विजय मिळवितानाच लोकसभेच्या २१ जागांवरदेखील तेलगू देसम पार्टी(टीडीपी)ला विशेष यश महत्त्व प्राप्त झाले आहे. या विजयासह चंद्राबाबू नायडू राष्ट्रीय राजकारणात किंगमेकरच्या भूमिकेत आल्यानंतर अमरावती पुन्हा चर्चेत आले आहे.