शेअर बाजार विश्लेषण: चार दिवसांच्या वाढीनंतर प्राईज करेक्शन 'नफा बुकिंग' सुरू सेन्सेक्स ३३.४९ अंशाने घसरला तर निफ्टी ५.२५ अंशाने वाढला

बँक निर्देशांकात घसरण रिअल्टी, तेल गॅस समभागात वाढ

    11-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात संमिश्र घसरण झाली आहे. कालच्या घसरणीचा पॅटर्न आज कायम राहिला आहे. कालप्रमाणेच सकाळच्या सत्रात वाढ होऊनदेखील अखेर मात्र घसरणीत झाली आहे. सेन्सेक्स ३३.४९ अंशाने घसरत ७६४५६.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक हा ५.६५ अंशाने वाढत २३२६४.८५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांक हा १४८.१६ अंशाने घसरत ५६६५८.९२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ७५.१५ अंशाने घसरण होत ४९७०५.७५ पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७४ व ०.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८१ व ०.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये सकाळच्या सत्रात सगळ्या समभागात वाढ झाली होती. अखेरच्या सत्रात हा कौल संमिश्र राहिला आहे. सर्वाधिक घसरण हेल्थकेअर (०.५०%) निर्देशांकात झाली असून मिडस्मॉल हेल्थकेअर (०.०३%),फा र्मा (०.४३%),मेटल (०.०६%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक वाढ सकाळप्रमाणेच रिअल्टी (१.१३%) समभागात व तेल गॅस (१.३३%)झाली आहे. याशिवाय पीएसयु बँक (०.१५%), कनज्यूमर ड्युरेबल्स (०.२५%), ऑटो (०.८३%) समभागात झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९६९ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २४६९ समभाग वधारले असून १३९१ समभागात घसरण झाली आहे. त्यातील २५४ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २२ समभागांच्या मूल्यां कनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. आज ३७६ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १३० समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७५२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६९७ समभागात वाढ झाली आहे ९६५ समभाग घस रले आहेत. त्यातील १६२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर १३ समभागांच्या मूल्यांक नात सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण १७३ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३८ समभाग लोअर सर्किट वर राहिले आहेत.
 
आज बीएसईतील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२७.०५ लाख कोटी रुपये होते तर एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४२३.४९ लाख कोटी रुपये होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. डॉलर वधारल्याने रुपयांची किंमत घसरली होती. अखेरीस रूपया ८३.५९ प्रति डॉलर किंमतीवर स्थिरावला आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात आज सकाळपर्यंत घसरण झाली होती. डॉलर वधारल्याने तसेच अमेरिकेतील अपेक्षित रोजगार निर्मिती आकडेवारीपेक्षा सकारात्मक आकडेवारी आल्यानंतर युएस बाजारातील सोने दबावाखाली आले होते. १८ महि न्यानंतर पीपल बँक ऑफ चायनाने सोन्याची खरेदी थांबल्यामुळे बाजारातील मागणी कमी झाली होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरा वरील निर्देशांकात घसरण झाल्याने सोने स्वस्त झाले होते. आज संध्याकाळपर्यंत युएस गोल्ड स्पॉट दरात ०.१२ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.०८ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
भारतातील एमसीएक्स सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१३ टक्क्यांनी घसरण होत सोने ७१३४२.०० पातळीवर पोहोचले तर २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात किरकोळ वाढ झाली होती. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात १५० रुपयांनी वाढत ६५८५० रुपयांना पोहोचले होते. तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात १७० रुपयांनी वाढ होत ७१८४० पातळीवर पोहोचले आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात कालपर्यंत मोठी वाढ झाली होती. महागाई आकडेवारीनंतर रोजगार निर्मिती आकडेवारीत अपेक्षेपेक्षा चांगली आकडेवारीमुळे तेलाच्या किंमतीत मागणी वाढू शकते. काल क्रूड तेल निर्दे शांकात २.५ टक्क्यांनी वाढ झाली होती. फेडरर रिझर्व्हची बैठक होण्याची शक्यता असल्याने आगामी काळात व्याजदरावर निर्णय आगामी काळात होऊ शकतो. युएस अर्थव्यवस्था स्थिर होईपर्यंत फेडरल रिझर्व्ह बँक काळजीपूर्वक पाऊले टाकू शकते.
 
आज अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (API) अहवाल देखील अपेक्षित असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारा आगामी बदल या मुद्यावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.४७ टक्क्यां नी घसरण झाली आहे. Brent क्रूड निर्देशांकात ०.४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.२३ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
आज शेअर बाजारात वीआयएक्स हा तेजीत राहिला. बाजार बंद होताना VIX Volatility Index हा निर्देशांक १४.७६ टक्क्यांवर राहिला असून प्रामुख्याने खालच्या बाजूला १० टक्क्यांनी घसरला होता. विशेषतः नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर गुंतवणूक दारांमध्ये गठबंधन सरकार आल्यामुळे लोकप्रिय योजनेचा भरणा असेल का आर्थिक सुधारणावर लक्ष दिले जाईल हा प्रश्न पडला होता. परंतु लोकप्रिय योजनेबरोबरच आर्थिक सुधारणावर मोदी एनडीए सरकार भर देणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी याआधी म्हटले आहे. परंतु गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण राहिल्याने अस्थिरतेचे प्रतिक असलेला वीआयएक्स आज चळव ळीत राहिला आहे.
 
दुसरीकडे बाजारात चार वेळा रॅली झाल्यानंतर बाजार पुन्हा प्राईज करेक्शनमध्ये जाण्याची शक्यता आहे. आर्थिक पातळीवर अर्थव्यवस्थेत संमिश्र प्रतिसाद मिळत असलेतरी भारताच्या जीडीपीचा आगामी मजबूत स्थितीचा हवाला अनेक अर्थतज्ज्ञांनी व आरबीआयने दिला आहे. ७ ऐवजी ७.२ टक्क्यांनी जीडीपी वाढू शकतो असे नुकतेच आरबीआयने म्हटले होते. तसेच मागील तिमाहीत ७.८ टक्क्यांवर जीडीपी पोहोचला होता. उत्पादन, सेवा, मुलभूत सुविधा व भांडवली खर्च यामध्ये प्राथमिकता नवीन सरकार देण्याची चिन्हे असल्यामुळे यांचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो. तरीही बाजारात आज प्राईज करेक्शन झाले आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
कालपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी (Foreign Portfolio Investors) ने २५७२.३८ कोटींची गुंतवणूक बाजारातून काढून घेतली होती. आजदेखील ही काढून घेतल्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे बाजारातील मिडकॅप,स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम राहिली आहे. मात्र दोन्ही बँक निर्देशांकात घसरण झाल्याने आज बाजारात रॅली होण्यास अडथळे निर्माण झाले होते.
 
बीएससी निर्देशांक ०.०४ टक्क्यांनी घसरला आहे तर एनएसई निर्देशांक ०.०२ टक्क्यांनी वाढला असल्याने बाजाराची अखेर सपाट राहिली आहे. विशेषतः मिडकॅप शेअर्सने चांगली कामगिरी केली असली तरी मोठे शेअर्स म्हणून समजल्या जाणाऱ्या आय सीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी समभागात घसरण झाल्याने बाजारात घसरण झाली.तसेच लार्जकॅप मध्ये प्राईज करेक्शन होताना 'नफा बुकिंग' ची चिन्हे दिसत असल्याने बाजारात डाऊनवर्ड ट्रेंड राहिला आहे. दुसरीकडे तेल व गॅस जीएसटी अंतर्गत आणण्याची सरकारची योजना असल्याने तेल गॅस समभागात १ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.
 
आज बीएसईत लार्सन, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एनटीपीसी, एचसीएलटेक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, पॉवर ग्रीड, एसबीआय, विप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस या समभागात वाढ झाली आहे तर कोटक महिंद्रा, एशियन पेंटस, आयटीसी, रिलायन्स, सनफार्मा, एक्सिस बँक, जेएसडब्लू स्टील, एचयुएल, इंडसइंड बँक, इन्फोसिस, टायटन कंपनी, भारती एअरटेल या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज ओएनजीसी, लार्सन, टाटा मोटर्स, अदानी पोर्टस, मारूती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, अल्ट्राटेक सि मेंट,अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, बीपीसीएल, एचसीएलटेक, बजाज फायनान्स, एनटीपीसी, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, ब्रिटानिया, एसबीआय, एचडीएफसी लाईफ, ग्रासीम, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, अदानी एंटरप्राईज या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'आज बाजार आश्वस्त झाला सर्व मंत्रीमंडळ जवळजवळ तेच राहीले आहे.आज चार दिवसातील तेजीला ब्रेक लागून आज बाजार थोडा खाली आला.जागतिक पातळीवर युरोपने व्याजदर कपात केली. आता नंबर अमेरिका व लगेच भारतात व्याज दर कपात होईल फक्त ते कधी जुलै किंवा सप्टेंबर एवढेच पहायचे.तोपर्यंत बाजार कंसोलीडेशन फेजमध्ये येणे अपेक्षित आहे.जेणे करून आताची तेजी गुंतवणूकदार कॅश करून परत बजेट व व्याज दरात कपातीची तेजी एन्जॉय करू शकतात. अशीच तेजी मंदी सुरू राहणार असे चित्र पाहू शकतो.एकंदरीत स्थिर सरकार खूपच महत्त्वपूर्ण आहे. धोरणात्मक अनेक निर्णयावर बाजार सकारात्मक प्रतिसाद देईल असे आश्वासक चित्र असेल असा विश्वास आज बाजारात दिसला.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' इंडिगोच्या प्रवर्तकांनी सुमारे २% एअरलाइन्सची सुमारे ३७०० कोटी रुपयांना ब्लॉक डीलमध्ये विक्री केली. या व्यवहारानंतर, स्टॉकमध्ये सुमारे ४.३२ % ची घसरण झाली. नव्याने स्थापन झालेल्या एनडीए सरकारने ३ कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासा ठी मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पात्र कुटुंबांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासा  ठी,गृहनिर्माण वित्तपुरवठा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मोजके शेअर आज ९% पर्यंत वाढले.'
 
शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, 'सोमवारचा ट्रेंड चालू ठेवून बाजार श्रेणीबद्ध राहिले आणि अपरिवर्तित राहिले. सपाट सुरुवातीनंतर, निफ्टी हळूहळू वर चढत गेला, परंतु उ त्तरार्धात नफा-टेकिंगने सर्व नफा पुसून टाकला, अखेरीस २३२६४.८५ वर स्थिरावला. दरम्यान, एक मिश्रित क्षेत्रीय कल कायम राहिला, रिअल्टी आणि ऑटो क्षेत्रे उच्च स्थानावर आहेत आणि सर्वोच्च कामगिरी करणारे म्हणून उदयास आले आहेत, तर एफ एमसीजी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रांना काही नफा घेण्याचा सामना करावा लागला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढल्याने व्यापक निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली.
 
निर्देशांकातील हा विराम मोठ्या प्रमाणात अपेक्षित होता, आणि आम्ही तो लवकरच संपेल अशी अपेक्षा करतो. यादरम्यान, व्यापाऱ्यांनी सकारात्मक पूर्वाग्रहासह स्टॉक-विशिष्ट ट्रेडिंग दृष्टीकोन राखला पाहिजे. महत्त्वाच्या क्षेत्रांव्यतिरिक्त, कृषी-संबंधित साठा (खते आणि साखर) आणि रासायनिक साठा यासारख्या काही थीम लक्षवेधी आहेत. सहभागींनी त्यानुसार त्यांची स्थिती समायोजित करावी.'
 
कच्च्या तेलाच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना कोटक सिक्युरिटीजचे एव्हीपी कमोडिटी रिसर्च कायनात चैनवाला म्हणाले,'उच्च मागणीच्या अपेक्षेने आणि SPR रिफिलिंगच्या संभाव्यतेवर आठवड्याच्या सुरुवातीला WTI क्रूड ऑइल फ्युचर्स ३% पेक्षा जास्त वाढले. यूएस एनर्जी सेक्रेटरी जेनिफर ग्रॅनहोम यांनी रॉयटर्सला सांगितले की, देश स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह पुन्हा भरण्याच्या दरात घाई करू शकतो कारण या साठ्याची देखभाल वर्षाच्या अखेरीस पूर्ण झाली आहे. या उन्हाळ्यात इंधनाची मागणी वाढ ण्याची अपेक्षा देखील किमतींना मदत करते. अमेरिका आणि चीनकडून अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक डेटा असूनही, गुंतवणूकदार या आठवड्यात OPEC, IEA आणि EIA च्या मासिक अहवालांकडे लक्ष देतील.'