एसबीआय ३ अब्ज डॉलर्सचा निधी उभा करणार

वाढत्या कर्जाच्या मागणीमुळे बँक डेटमार्फत निधी जमावणार

    11-Jun-2024
Total Views |

sbi bank
 
 
मुंबई: वाढत्या पोर्टफोलिओ गरजेसाठी,कर्ज वाटपासाठी, व आगामी विस्तारीकरणाच्या गरजेसाठी आरबीआयनंतर सर्वाधिक मोठी पब्लिक सेक्टर बँक अशी ओळख असलेल्या एसबीआय बँकने ३ अब्ज डॉलर्सचा निधी उभा करण्याचे ठरवले आहे.सुत्रांच्या माहिती प्रमाणे हा निधी मुख्यतः खाजगी प्लेसमेंट, पब्लिक ऑफर या माध्यमातून होऊ शकते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने या निर्णयाला आज मान्यता दिली आहे.
 
वाढत्या कर्जाच्या मागणीमुळे बँकेने आपल्या भांडवली धनसंचयात वाढ करण्याचे ठरविले आहे. याशिवाय कॅनरा बँक, पंजाब सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक या बँकांनीही आगामी काळात आपल्या भांडवलात वाढ करण्यासाठी निधी उभारणी करण्याचे ठरवले आहे. जानेवारी महिन्यात बसेल ३ (Baseel III व tier 1 perpetual bond) माध्यमातून ५० अब्ज डॉलर्सचा निधी उभारला होता.
 
मागील तिमाहीत बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २४ टक्क्यांनी निव्वळ नफा वाढत २०६९८ कोटीवर पोहोचला होता. तसे च बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income) मध्ये ३.१ टक्क्यांनी वाढ होत ४१६५६ कोटींवर निव्वळ उत्पन्न पोहोचले होते. बँकेच्या वाढत्या कर्जाच्या मागणीमुळे बँकेने हा निधी वाढवण्यासाठी निर्णय घेतला आहे.