"८ जागा मिळाल्याने पवारांना हत्तीचे बळ!"

प्रविण दरेकरांचा टोला

    11-Jun-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : ८ जागा मिळाल्याने शरद पवारांना हत्तीचे बळ आले आहे, असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवारांना लगावला आहे. हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असे विधान शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केले होते. यावर आता दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, " शरद पवार आत्म्याचे अस्तित्व मानायला तयार झाले हे एक बरे आहे. कारण शरद पवार स्वतः देव मानत नाहीत. ते नास्तिक आहेत. त्यामुळे आत्म्याची संकल्पना जी आहे ते मान्य करताहेत हेही थोडके नाही. पवारांना ज्या ८ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांना हत्तीचे बळ आले की काय म्हणून ते सगळ्यांना सोडणार नाहीत म्हणताहेत. काळ हा प्रत्येक गोष्टीचे उत्तर देत असतो. राजकारणात चढउतार येत असतात. संयमाने वागावे असे सांगणारे पवार हे आता सोडणार नाही, बघून घेतो असं बोलत आहेत. यात थोड्याशा यशाचा मिळालेला अहंकार दिसून येतोय," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "तुमचा जागा झाला मौलवी बाणा अन् हिरवं रक्त झालं तप्त!"
 
यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "स्वतः सुपारीबाज असल्यामुळे दृष्टी तशी सृष्टी दिसते. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली होती. त्यातले अर्धे काम त्यांनी केले आहे. उर्वरित काम करण्यासाठी ते सुपारी पूर्ण करायची भुमिका बजावत आहेत. शिवसेना संपुष्टात आणण्याचे काम सुपारीबाज राऊत करत आहेत," असे ते म्हणाले.