जंगल मे भौकाल! मिर्झापूर ३ चा टीझर प्रदर्शित आणि रिलीज डेटही आली समोर

    11-Jun-2024
Total Views |
 
Mirzapur 3
 
 
मुंबई : बहुप्रतिक्षित वेबसीरिज 'मिर्झापूर ३' चा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. यापुर्वी मिर्झापूरच्या दोन सीझनच्या यशानंतर आता तिसरा सीझन भौकाल गाजवायला येत आहे. यावेळी गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या दोघांमध्ये भयानक युद्ध रंगणार असून कालीन भैय्या मुन्ना भैय्याच्या हत्येचा बदला कसा घेतात आणि गु़ड्डू भैय्याची मिर्झापूर मधली दहशत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 
'मिर्झापूर' वेबसीरिजने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली होती. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटी गुड्डू भैय्या आणि गोलू मुन्ना भैय्याची हत्या करतात. यामध्ये कालीन भैय्या वाचतो. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सीरिजचा टीझर समोर आला असून यात गोळीबार, रक्तपात, राजकारण असं सगळंच दिसत आहे. आता हे सारं काही ५ जुलैला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
 
या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, शीबा चड्डासह अनेक कलाकारांची भूमिका आहे. अॅमेझॉन प्राईमवर सीरिज रिलीज होणार आहे.