लव्ह जिहाद! खलील खान बनला अनिल यादव; पीडितेला २ वर्ष ओलिस ठेवून केला बलात्कार

    11-Jun-2024
Total Views |
 Love-Jihad
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. येथे खलील खान नावाच्या तरुणाने आपली बनावट ओळख सांगून एका मुलीवर बलात्कार करून तिचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा विवाहित होता, परंतु त्याने स्वत: ला अविवाहित असल्याचे सांगितले. त्याने पीडितेला दोन वर्षे कैद करून ठेवले आणि तिचा अनेकवेळा गर्भपातही करून घेतला.
 
यादरम्यान त्याने मुलीला अनेक वेळा मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला शनिवार, दि. ८ जून २०२४ अटक केली. हे प्रकरण हमीरपूर जिल्ह्यातील बिमवार पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे मूळच्या गोरखपूर जिल्ह्यातील एका मुलीने जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे दि. १ जून २०२४ रोजी तक्रार दाखल केली. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, ती हरियाणातील फ्लिपकार्ट कंपनीत काम करत होती.
  
 
या कंपनीत तिला एक मुलगा भेटला, त्याने स्वतःची ओळख अनिल यादव अशी केली. अनिल यादवने काही दिवसांतच पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने २०२२ पासून पीडितेवर सतत बलात्कार करू लागला. काही दिवसांनी मुलीला कळले की ती ज्याला अनिल यादव समजत होती तोच खलील खान होता. याची माहिती मिळताच तरुणीने खलीलपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. याचा खलीलला राग आला. त्याने मुलीला ओलीस ठेवले.
  
यावेळी त्याने पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. मुलीला ओलीस ठेवून तो तिच्यावर सतत बलात्कार करत होता. तिने नकार दिल्यास खलील तिला बेदम मारहाण करायचा. जवळपास दोन वर्षांच्या बंदिवासात पीडिता तीनदा गर्भवती झाली. तीनही वेळा खलीलने औषध देऊन तिचा गर्भपात केला. सलग तीन गर्भपात केल्याने मुलगी अशक्त झाली होती. दि. ८ मार्च २०२४ रोजी पीडित मुलगी खलीलच्या गावी गेली आणि तिथे तिथे ती खलीलच्या आई-वडिलांना भेटली.
  
खलीलच्या पालकांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आधीच विवाहित आहे. तसेच त्याच्या पत्नीविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. जेव्हा खलीलला समजले की, पीडितेसमोर आपले संपूर्ण रहस्य उघड झाले आहे, तेव्हा त्याने मुलीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. खलीलवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे.
 
पोलिसांनी दि. १ जून २०२४ रोजी खलीलविरुद्ध एफआयआर नोंदवला. खलीलविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६ (२)(एन), ३४२, ३१३, ३२३ आणि ५०६ आणि उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध कायद्याच्या कलम ३/५(१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी छापा टाकून खलीलला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.