एकाचे जीवन संपवल्याप्रकरणी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक, सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ

    11-Jun-2024
Total Views |

south star 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला बंगळुरू पोलिसांनी हत्येच्या प्रकरणा ताब्यात घेतले आहे. एका हत्येच्या प्रकरणात आरोपीने दर्शनचे नाव घेतल्यामुळे त्याच्यावर कामाक्षिपाल्या पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दर्शन थुगुदीपा सतत आरोपींच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीची चित्रदुर्ग येथील सुमनहल्ली पुलावर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी रेणुकाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर याप्रकरणी अभिनेत्याला कामाक्षिपाल्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्या म्हैसूर येथील फार्म हाऊसमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दर्शनला म्हैसुरहून बेंगळुरूला आणले जात आहे. कारण गुन्ह्याची नोंद कामाक्षिपल्य पोलिसांच्या हद्दीत करण्यात आली आहे.
 
 
 
बंगळुरू पोलिसांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या काही साथिदारांना अटक करण्यात आली आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या हे प्रकरण चौकशी पथावर असल्यानं या प्रकरणावर जास्त काही सांगता येणार नाही.