बहुप्रतिक्षित 'कल्की २८९८ एडी'चा ट्रेलर रिलीज, शेवटी दिसली ‘या’ सुपरस्टारची झलक

    11-Jun-2024
Total Views |
 
Kalki 2898 AD
 
 
मुंबई : अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपसून चर्चा सुरु होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकमुळे तर ट्रेलर कधी येणार याचीच प्रेक्षक वाट पाहात होते. आणि आता त्यांची ही उत्सुकता संपली असून कल्की २८९८ एडी या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेलरच्या शेवटी आणखी एका सुपरस्टारची विशेष झलक दिसली आहे.
 
कल्की २८९८ एडी या चित्रपटात भविष्यकालीन जग कसे असेल याचे काल्पनिक चित्रपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी अमिताभ बच्चन अॅक्शन करताना दिसत आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरच्या शेवटी आणखी एका सुपरस्टारची झलक दिसली असून हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेते कमल हासन आहेत. आतापर्यंत त्यांचा लूक रिव्हील केला गेला नव्हता पण ट्रेलरच्या निमित्ताने त्यांची पहिलीच झलक दाखवण्यात आली आहे. 'डरो मत, एक नया युग आ रहा है', असा त्यांचा एकच संवाद ट्रेलरमध्ये मोठा एम्पॅक्ट देऊन जातो.
 
नाग अश्विन यांनी दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास, कमल हासन, दिशा पाटनी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.