राज्यातील सायबर गुन्ह्यांना बसणार लगाम

837 कोटींचा देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

    11-Jun-2024
Total Views |

सायबर
 मुंबई :सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यामुळे त्यांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, लवकरच तो कार्यान्वित केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांविरोधात तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या गृहविभागातील विविध तंत्रज्ञान.
 
विकास प्रकल्पांच्या अंतर्गत हा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती विधानसभेत दिली होती. या प्रकल्पासाठी 837 कोटी 86 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. 5 वर्षे 5 माहिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने निधीचे वितरण केले जाणार आहे. मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांद्वारे हा प्रकल्प राबवला जाणार आहे.