"तुमचा जागा झाला मौलवी बाणा अन् हिरवं रक्त झालं तप्त!"

चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल

    11-Jun-2024
Total Views |
  
Sanjay Raut
 
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तुमचा मौलवी बाणा जागा झाला अन् हिरवं रक्त तप्त झालं आहे. त्यामुळे तुमचा आत्मा सत्तेविना अतृप्त राहणार आहे, असे त्या म्हणाल्या. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत संजय राऊतावंर जोरदार निशाणा साधला. चित्रा वाघ म्हणाल्या की, "तुम्ही मोदीजींबद्दल काहीही बरळा किंवा स्वतःच्या मालकांना पंतप्रधानपदी बसवण्याची स्वप्न पहा. हे सगळं फक्त तुमच्या स्वप्नातच घडू शकतं. त्यामुळे तुम्ही स्वप्न पाहात रहा आणि शिव्या-शाप देत रहा. कारण तुमचा हा विरोध आमच्यासाठी बळ ठरतो."
 
हे वाचलंत का? -  मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला कोणती खाती? जाणून घ्या...
 
त्या पुढे म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दैदिप्यमान यश मिळवत राहतील आणि तुमचे आत्मे भटकत राहतील. तुमचा मौलवी बाणा जागा झाला आणि हिरवं रक्त तप्त झालंय. त्यामुळे काहीही करा तुमचा आत्मा सत्तेविणा अतृप्त राहणार," असा टोलाही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे.