नियम नवे, जुनाच खेळ! अनिल कपूरच्या झक्कास अंदाजात रंगणार तिसरं पर्व

    11-Jun-2024
Total Views |
 
Big Boss OTT
 
 
मुंबई : बिग बॉस आणि सलमान खान हे समीकरण पक्क आहे. पण बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमध्ये फार मोठा बदल झाला असून अभिनेते अनिल कपूर होस्ट करताना दिसणार आहेत. १० जून रोजी प्रोमो रीलिज करण्यात आला असून यंदाच्या सीझनमध्ये नियम नवे असतील, मात्र खेळ जुनाच असणार आहे.
 
ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये 'बिग बॉस ओटीटी ३'च्या घरात धम्माल करणार आहेत. लवकरच हा मसालेदार ड्रामा सुरू होणार असून प्रोमोवर प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'मौसम बदलेगा, तापमान बदलेगा, एके के आने से अब सब बदलेगा', असं कॅप्शन देत जिओ सिनेमाच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन आगामी पर्वाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
 

Big Boss OTT 
 
अनिल कपूर बिग बॉस या ओटीटीच्या पर्वात पहिल्यांदाच होस्टिंग करणार असून २१ जूनपासून तीसऱ्या सीझनला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना जिओ सिनेमावर Bigg Boss OTT चे नवे पर्व पाहता येणार आहे.