भाजपाच्या कमी जागा या अर्थव्यवस्थेमुळे नाही तर इतर कारणांमुळे तरीही …

तरीही आर्थिक सुधारणा वेगाने होणार असल्याचे मॉर्गन स्टॅनलीचे निरिक्षण

    11-Jun-2024
Total Views |

morgan stanley  
 
मुंबई: येत्या १० वर्षात नागरिकांचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income) हे दुपटीहून अधिक वाढणार असल्याचे मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले आहे. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे आगामी काळात भारताची आर्थिक घोडदौड समाधानकारक पातळीवर कायम राहणार असल्याचे यात सांगितले गेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या जागा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत घटलेल्या असताना त्या 'आर्थिक' कारणांमुळे अथवा अर्थव्यवस्थेमुळे नसून इतर कारणांमुळे घटल्या असल्याचा दावा मॉर्गन स्टॅनलीने केला आहे.अर्थव्यवस्थेतील सुधारणा या कायम राहतील व अर्थव्यवस्थेला आगामी का ळातही गती मिळेल असेही या अहवालात म्हटले गेले आहे.
 
दरडोई उत्पन्नांबाबत सांगायचे झाल्यास, भारताचे दर डोई उत्पन्न (Per Capita Income) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी दरडोई उत्पन्न १८३२३६ रुपये असेल जे आर्थिक वर्ष २०२२ -२३ मध्ये १६९४९६ रुपये होते.अहवालातील माहितीप्रमाणे, हे उत्पन्न ५८०० डॉलर्सने वाढू शकते.
 
भारतातील अर्थव्यवस्थतेतील मायक्रो इकॉनॉमी मुद्दे हे सकारात्मक असल्याचे यात नमूद केले आहे. मार्च तिमाहीत अपेक्षित असलेल्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) हून अधिक आकडेवारी गाठण्यात भारताला यश आले होते.अहवालात म्हटल्या प्रमाणे, क्रेडिट वाढ १५.८ टक्क्यांपर्यंत होऊ शकते.भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाल्यामुळे देशातील उत्पादकता (Manufacturing), उर्जा स्थित्यंतरे (Energy Transition) व डिजिटल पायाभूत सुविधा (Digital Infrastructure) यातील बदला मुळे आर्थिक घोडदौड वाढू शकते असे अहवालात म्हटले गेले आहे.
 
भारतीय जनता पार्टीने गमावलेल्या अनेक जागा आर्थिक कारणांमुळे नसून इतर कारणांमुळे आहेत.तरीही सरकार हे आर्थिक सुधारणांसाठी सकारात्मक राहील असे वाटते असे या अहवालात म्हटले आहे. इतर आगामी उभरती बाजारपेठ म्हणून भारता व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, मेक्सिको,सिंगापूर, ग्रीस, पोलंड, इंडोनेशिया, इजिप्त या देशांचा समावेश अहवालात करण्यात आ लेला आहे.